दि जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची सहकाराची गाथा
दिनांक ०१/०५/१९८१ रोजी औरंगाबाद जिल्याचे विभाजन होऊन जालना, अंबड, भोकरदन व जाफ्राबाद या चार तालुक्यांचा मिळून "जालना" जिल्हा निर्माण करण्यात आला. त्यानुसार "जालना" जिल्ह्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दि ०१/०७/१९८३ रोजी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभाजन होऊन जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निर्मिती करण्यात आली.